ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीनेयूपीएससी परीक्षा गुणवंततुषार पवारचा सन्मान!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीनेयूपीएससी परीक्षा गुणवंततुषार पवारचा सन्मान!

प्रकाशन: 06 Jun 2023 03:39 PM
वाचन संख्या 29

नांदोस येथे मूळ गावी झाला सत्कार

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर

बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने
यूपीएससी परीक्षा गुणवंत
तुषार पवार याचा त्याच्या मालवण तालुक्यातील नांदोस निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी तुषार पवार म्हणाले, अविनाश धर्माधिकारी यांचे ओरोस येथे झालेले व्याख्यान ऐकून आपणही ही परीक्षा ध्यावी असा विचार मनात आला .५ वी शिष्यवृत्ती, ७ वी शिष्यवृत्ती, एनएम एमएस या परीक्षांचा आपणास खूपच फायदा झाला हेही त्याने आवर्जून सांगितले अन् स्पर्धा परीक्षेची ती पायरी आहे. सर्व मुलानी ती परीक्षा देणे आवश्यक आहे. असेही तो म्हणाला.
खाजगी क्लास काही महिने जॉईन केला अन् त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे सारा अभ्यास यू ट्यूब व पुस्तकाच्या माध्यमातून केला. रोज सात ते आठ तास अभ्यास करायचो.
नंबर ८oo पेक्षा जास्त असून यापेक्षा जास्त गुणवत्ता मिळवून प्रशासकीय सेवेत यायचं आहे हे त्याने ठासून सांगितले. तो पुन्हा परीक्षेस बसला आहे.
सार्‍या गप्पात त्याचा नम्र स्वभाव, स्वभावातील ऋजुता आम्हा सर्वाना प्रभावीत करून गेली असे दीपक भोगटे म्हणाले.
अभिनंदन पत्रातील प्रा मधु दंडवते व
बॅ नाथ पै यांचे नांव व फोटो पाहून तुषार खूप आनंदीत झाला अन्
“या दोन महनीय आदरणीय व्यक्तींचा अभ्यास केल्याशिवाय सिंधुदुर्गचे खरी प्रतिमा दिसणार नाही अन अभ्यास पूर्ण होणार नाही. ते माझे आदर्श आहेत” असे तुषार म्हणाला.
ऑक्टोबर मध्ये सेवांगण मालवण व सेवांगण कट्टा येथे विद्यार्थ्यासाठी पूर्ण दिवसाची कार्यशाळा घेण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला आहे.
यावेळी किशोर शिरोडकर, शाम पावसकर. दीपक भोगटे, वैष्णवी लाड, प्रशांत म्हाडगुत, सुजाता पावसकर, श्रीधर गोंधळी, तुषारचे आई- वडिल, आजी -आजोबा, अमित चव्हाण आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स