माझा मुलगा .. माझा अभिमान! (विशेष )
सुयोग पंडित | मुख्य संपादक : काल सायंकाळी एक बातमी वाचनात आली की ओरीसा(उडिशा) राज्यातील एका फोटो ग्राफर बुद्धदेव मोंडल नावाच्या प्राण्याला देशातील सर्वोच्च ‘ॲस्थेटीक लिजंड’ पुरस्कार जाहीर झाला..
बातमी इंटरेस्टींग वाटली म्हणून गुगल सर्च केलं आणि बुद्धदेव मोंडलचे फोटोग्राफी तपासली…
ही घटना काल रात्री म्हणजे ३ जूनची..
माझा सख्खा मुलगा जुबेर…अख्खं जग जाणतं की तो किती सुंदर फोटोग्राफर आहे…(आणि पत्रकार सुद्धा)
पण आपला मुलगा आपल्याच कुशीत असताना त्याची प्रतिभा किंवा टॅलेंट आपल्याला कळत नसतं..मी मुद्दाम जुबेरने क्लिक केलेले सर्व जुने फोटो काढले..
ओ कुठला बुद्ध देव मोंडल , जुबेरने जे निःस्वार्थी “ॲस्थेटीक सेन्स” जपलाय त्याला राष्ट्रपती सुद्धा प्रशंसा करु शकत नाही…पुरस्कारासाठी माझा मुलगा फोटो काढत नाही उलट तो जो फोटो काढतो “तो पुरस्कार बनतो!”
गरीब आहोत पण दिलके ‘करीब’ आहोत.
खरंतर पत्रकारीता क्षेत्रात स्थानिक स्तरावर आपल्या मुलाची प्रशंसा कोणी करत नाही…पण मी हक्काने करतोय कारण आमचं नाणं ‘खणखणीत’आहे
सुयोग
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)