ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
आंगणेवाडीत 'बँडेड रेसर' तथा धूळनागिणीला जीवदान ; सर्प मित्र स्वप्नील परुळेकर यांनी दिला महत्वाचा संदेश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आंगणेवाडीत 'बँडेड रेसर' तथा धूळनागिणीला जीवदान ; सर्प मित्र स्वप्नील परुळेकर यांनी दिला महत्वाचा संदेश.

प्रकाशन: 29 May 2023 06:27 PM
वाचन संख्या 474

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवच्या आंगणेवाडीच्या माळरानावर आढळून आलेल्या ‘बँडेड रेसर’ या सर्पाला कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा बिनविषारी साप असून दक्षिण कोकणात नायकुळ तर विदर्भात याला धूळनागीण म्हणतात.
आंगणेवाडी माळरानावर काहीसा वेगळा असलेला हा सर्प दिसून आल्यानंतर बाबू आंगणे यांनी सर्प मित्र स्वप्नील परुळेकर याना पाचारण केले.

त्यांनी या सर्पाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. याची सरासरी लांबी एक ते दीड मीटर पर्यंत असते. रंग फिकट किंवा गडद तपकिरी, शरीर लांब, निमुळते टोकदार डोके, शेपूटही लांब व निमुळती असते. दिसण्यात नाग सापाशी साधर्म्य असल्यामुळे याला धूळनागिन म्हटले जात असावे. या सापाची मादी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान ५-६ अंडी घालते.
धूळ नागिणीचे प्रमुख खाद्य उंदीर असल्यामुळे धामण प्रमाणे हा साप सुद्धा शेतकऱ्याचा मित्र ओळखला जातो. याचे वास्तव्य गवतात, झुडूपात, बिळात किंवा दगडांमध्ये असते. हा साप दिनचर म्हणजे दिवसा फिरणारा असून डिवचले गेल्यास मानेचा भाग फुगवतो. त्यामुळे काहीसा नागासारखा दिसत असल्यामुळे याला विषारी नागच समजून हत्या होते अशी माहिती सर्प मित्र परुळेकर यांनी दिली. त्यामुळे कोणत्याही प्रजातीचा सर्प दिसून आल्यास त्याला न मारता सर्पमित्रास बोलावण्याचे आवाहन तथा संदेश परुळेकर यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 29
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 173

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स