ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगाव कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा ९९.३१ टक्के निकाल वाणिज्य, कला शाखेत मुलींनी मारली बाजी
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगाव कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा ९९.३१ टक्के निकाल वाणिज्य, कला शाखेत मुलींनी मारली बाजी

प्रकाशन: 27 May 2023 02:19 PM
वाचन संख्या 211

शिरगाव | संतोष साळसकर: फेब्रुवारी २०२३ मध्ये पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शिरगाव कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.३१ टक्के लागला असून महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. वाणिज्य आणि कला या दोन्ही शाखांमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकाविण्याचा मान मुलींना मिळाला आहे. वाणिज्य शाखेतून दर्शना राणे तर कला शाखेतून हर्षदा चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.वाणिज्य शाखेत महाविद्यालयातून १०१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. या शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून अनुक्रमे दर्शना राणे हिने ८९ टक्के, साक्षी नरे हिने ८४.६७ टक्के तर साक्षी साटम हिने ८३.८५ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेतून ४५ विद्यार्थी परीक्षेचा प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा ९७.७७ टक्के निकाल लागला असून अनुक्रमे हर्षदा चव्हाण हिने ६८.८७ टक्के, सानिका तर्फे हिने ६६.३३ टक्के तर माधुरी सुर्वे हिने ६५.१७ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले.विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कलें, संस्था पदाधिकारी, संचालक, प्राचार्य शमशुद्दीन आत्तार यांनी अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स