बांदा एस टी स्वच्छतागृह प्रवाशासाठी खुले करा.अन्यत: स्थानकातच 'बस रोको आंदोलन' : रियाज खान
बांदा : राकेश परब /बांदा बसस्थानक आवारातील स्वच्छतागृहाचे येत्या आठ दिवसात उद्घाटन करुन प्रवाशांसाठी खुले करावे. अन्यथा बांदा स्थानकातच ‘बस रोको आंदोलन’ छेडण्याचा इशारा शिवसेना अल्पसंख्यांक उप तालुकाप्रमुख रियाज खान यांनी दिला आहे. तसे लेखी निवेदन बांदा बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रकाश नार्वेकर यांच्याकडे सादर केले. यावेळी एस. टी. अभियंता अक्षय केंकरे यांनी चार दिवसांत स्वच्छतागृह आश्वासन दुरध्वनीवरुन दिले. त्यांच बरोबर बस स्थानक येथे दोन वाहतुक नियत्रंणची कायम स्वरुपी नेमणूक करावी अशी मागणी यांनी खान यांनी केली आहे. बांदा बसस्थानक आवारात प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याचे उद्घाटन करुन प्रवाशांसाठी खुले केलेले नाही. सेनेचे रियाज खान यांनी यापूर्वीही चार वेळा एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विशेषतः महिला प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येत्या काही दिवसात शाळा, कॉलेज सुरु होणार आहेत. बस स्थानक येथे सोमवारी वळता इतर दिवशी एकच वाहतुक नियत्रंण दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतो. यामूळे प्रवाशांची गैरसोय होते आहे. बांदा बस स्थानक येथे दोन वाहतुक नियत्रंणची कायम स्वरुपी नेमणूक करावी अशी खान यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या आठ दिवसात स्वच्छतागृह सुरु करण्याची मागणी रियाज खान यांनी केली आहे. अन्यथा प्रवाशांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी मंथन गवस,संजय आईर, व्यंकटेश ऊरुमकर, मोहसीन खान,राजा खान, महेश शिरोडकर,सागर धोत्रे,नंदकिशोर कांबळे, अन्वर खान,विश्वास पंडीत,संजय बांदेकर, आबा धुरी,सदा राणे,सोहेल जमादार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. बादा एसटी बस स्थानक स्वच्छाता गुहाचे महत्व आधोरिकेत होणे गरजेचे आहे. बांदा एसटी आगार हे जिल्ह्यातील महत्वाचे व महामार्गावरील शेवटचे बसस्थानक आहे.गोवा राज्यात जाणारे व या बसस्थानकात अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही येत असतात. तसेच बांदा बाजारपेठेत व हायस्कूल काँलेजला जाणारे दर दिवशी हजारो विद्यार्था तसेच ५० हुन गावातील नागरीक खरेदिसाठी ये जा करत असतात.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)