अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून व्यवसायास वृद्धीस चालना
बांदा /राकेश परब: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत आवळेगाव ओरोस खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने १५वा वित्त आयोग अंतर्गत गावातील बचत गट, महिला व शेतकरी वर्ग यांच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत एकदिवसीय अभ्यास सहलीचे आयोजन आज दिनांक २३ मे रोजी करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. पूर्वा सावंत, उपसरपंच श्री. विवेक कुपेरकर, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी वर्ग अशा १०७ लोकांनी यात सहभाग घेतला होता. या अभ्यास सहली मध्ये शेळीपालन, काथ्या व्यवसाय, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र , घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत आदी विषय समाविष्ट करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून गावातील व्यवसायास वृद्धीस चालना मिळेल तसेच नवउद्योजक तयार होण्यास मदत होईल असे मत सौ पूर्वा सावंत यांनी मांडले. कोकण संस्थेच्या वतीने व्यवस्थापक प्रथमेश सावंत, समीर शिर्के, प्रदीप पवार यांनी या सहलीचे नियोजन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)