ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अक्कलकोट भूषण  नंदकुमार  पेडणेकर याना "स्वामी रत्न पुरस्कार" जाहीर!

अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर याना "स्वामी रत्न पुरस्कार" जाहीर!

प्रकाशन: 24 May 2023 01:39 PM
वाचन संख्या 38

मसुरे | प्रतिनिधी: श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर याना “स्वामी रत्न पुरस्कार २०२३” घोषित झाला आहे. समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट या संस्थेने श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्याना राज्यस्तरीय “स्वामीरत्न पुरस्कार २०२३” घोषित केला आहे. दिनांक ३० मे २०२३ रोजी पूणे येथील श्री अण्णाभाऊ साठे सभागृहात, वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष श्री.महेशराव कल्याणराव इंगळे आणि चोळप्पा महाराजांचे वंशज वे.शा.सं.श्री.अन्नू गुरुजी यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.पेडणेकर हे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात गेली वीस वर्षे उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था कडून घेतली जात आहे. यापूर्वीहुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याकारी संस्था कराड यांनी त्यांच्या धार्मिक व समाजसेवेची दखल घेऊन त्याना ९ वा राष्ट्रीय अक्कलकोट भूषण हा पुरस्कार २०२२ साली अक्कलकोट येथे प्रदान केला होता. समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट यासामाजिक संस्थेकडून नंदकुमार पेडणेकर याना स्वामी रत्न पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स