ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पोईप विरण कला व वाणिज्य महाविद्यालयाचा १२वीचा निकाल १००%

पोईप विरण कला व वाणिज्य महाविद्यालयाचा १२वीचा निकाल १००%

प्रकाशन: 04 Aug 2021 10:43 AM
वाचन संख्या 91

पोईप | ओंकार चव्हाण : शैक्षणिकवर्षे २०२०-२०२१ चा सौ. इं.द.वर्दम हायस्कुल व कला आणि वानिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण या महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 100%लागला असुन या महाविद्यालयामधुन एकूण 32 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थीनीनी यश संपादन करून ज्युनियर कॉलेजचे नाव पंचक्रोशीत तालुक्यात जिल्ह्यात सनमानाने राखून ठेवले आहे महाविद्यालय स्थापन झाल्यापासुन वाणिज्य शाखेचा 100%निकाल गेली कित्येक वर्षे निकालाची पंरपरा राखून ठेवलेली आहे
ग्रामीण भागातील ज्युनियर कॉलेजला लाभलेले तज्ञ प्राध्यापक ,विद्यार्थी ,पालक तसेच संस्थासंचालक यांचे मौलाचे असे मार्गदर्शन व सहकार्य या सर्वाच्या उदात्य हेतुने पोईप सर्कल एज्युकेशन संस्थेचा प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढतच आहे

12वीच्या कला शाखेत एकुन 16 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले आहेत या शाखेतुन प्रथम क्रमाक समीर दिपक पालव 480 गुण घेत 80% , द्धीतीय क्रमाक आदेश बाळकृष्ण पालव गुण 399 याला 66.50% ,तृतीय क्रमाक कु.प्रतिक्षा अशोक चव्हाण 397 गुण व 66.16%गुण मिळाले आहेत तर वानिज्य शाखेत 16 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले आहेत
या शाखेतुन प्रथम क्रमाक स्नेहल संदिप पारकर हिला 503 गुण 83.83% ,द्धीतीय क्रमाक प्रियांका रविद्रनाथ परब हिला 470गुण 78.33%तर,तृतीय क्रमाक आकाश कृष्णा राठिवडेकर याला 458 गुण 76.33% मिळवत दोन्ही शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण होत महविद्यालयाचा 100%निकालाची पंरपरा कायम ठेवल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थांचे संस्था अध्यक्ष मा, श्री अनिल दत्ताराम कांदळकर ,विद्यमान सर्व संस्थासंचालक मंडळ तसेच प्राचार्य श्री डि एन कांबळे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी गावातील शिक्षणप्रेमी,सर्व आजी माजी विद्यार्थी,पालक यासर्वानी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर प्रशालेच्या सर्व शिक्षकांना पुढील वर्षाचा बारावीचा निकाल 100% लागुदे अशा शुभेच्छा दिल्या

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 300

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स