ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत विधिशा  कुबल हिचे सुयश
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत विधिशा कुबल हिचे सुयश

प्रकाशन: 05 May 2023 12:12 PM
वाचन संख्या 51

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत गाबीत समाजाचे लोकजीवन या विषयावरील निबंध स्पर्धेत मालवण दांडी शाळेची विद्यार्थिनी कु.विधिशा रामचंद्र कुबल हिला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे 1500/- रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले. मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री अशोक तोडणकर यांच्या शुभहस्ते कु.विधिशा हीस सन्मानपत्र,सन्मान चिन्ह व रोख 1500/- रु. पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ मुंबई चे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर, गाबीत समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष सुजय धुरत, गाबीत समाज सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर, श्री बाबा मोंडकर, श्री अन्वय प्रभू, श्री.दाजी सावजी, श्री.नारायण धुरी श्री.महेंद्र पराडकर श्री,रुपेश प्रभू,श्री.रविकिरण तोरस्कर,श्री.तातु कुबल,श्री.पांडुरंग कोचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. दांडी शाळेची विद्यार्थिनी कु. विधिशा कुबल हिने मिळवलेल्या या यशाबद्दल श्री.संदीप लोणे,सौ.सरोज लोणे,श्री.विरेश लोणे,दांडी शाळेच्या मुख्या,सौ.विशाखा चव्हाण ,राज्यपुरस्कार प्राप्त पदवीधर शिक्षक श्री शिवराज सावंत सर, मनीषा ठाकूर ,श्री रामदास तांबे, दांडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.हेमंत चिंदरकर,उपाध्यक्ष श्री.पंकज धुरी,श्री.दिनकर शेलटकर ,तसेच दांडी ग्रामस्थ,पालक यांनी विधिशाने मिळवलेल्या या यशाबद्दल विशेष कौतुक केले आहे. विधिशाने यापूर्वी रोटरी क्लब मालवण आयोजित जिल्हास्तरीय वत्त्कृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. तसेच इयत्ता पाचवी मध्ये तीने शिष्यवृत्ती ही प्राप्त केलेली आहे, ज्ञानी मी होणार या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये तीने तालुकास्तरीय यश मिळवलेले होते, विधिशाने मिळविलेल्या या चौफेर यशाबद्दल तीचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स