ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा च्या सुट्टीतील मजाशिबीराचा उत्साहात समारोप!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा च्या सुट्टीतील मजाशिबीराचा उत्साहात समारोप!

प्रकाशन: 05 May 2023 12:07 PM
वाचन संख्या 67

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने सहा दिवस संपन्न झालेल्यालहान मुलांच्या शिबीराचा समारोप कला शिक्षक समीर चांदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.हस्तकला, कागद काम, चित्रकला, मातीकाम, पारंपारीक खेळ, गीत गायन अशा विविध उपक्रमांचा आनंद मुलानी घेतला. अत्यंत आनंददायी आणि खूप उत्साहवर्धक शिबीर संपन्न झाले.अन त्याचा भाग मला होता आले याचा फार आनंद वाटतो असे सुप्रसिद्ध कलावंत समीर चांदरकर या वेळी म्हणाले.अॅड समृद्धी म्हाडगुत म्हणाल्या, या शिबीरात मुलाना मनोरंजना सोबत अनेक अनोख्या खेळांचा गीतां चा परिचय झाला. या बद्दल त्यानी सेवांगणला धन्यवाद दिलेप्रारंभी दीपक भोगटे यानी या शिबीराची संकल्पना व सहकार्य केलेल्या सर्व शिक्षकांचे आभार मानले.बाळकृष्ण नांदोसकर यानी पालकाना व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.या वेळी या शिबीरात मार्गदर्शन केलेल्यासमीर चांदरकर, बाळ वाईरकर, मनोज काळसेकर, नम्रता पावसकर, विजयालक्ष्मी डगरे, वीणा म्हाडगुत, नम्रता पावसकर, सुवर्णा शिरोडकर यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.सेवांगण परिवारातील सेवानिवृत्त शिक्षकाडगरे मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन खास सत्कार करण्यात आला.दुर्वा नाईक, सोहम मसूरकर, तनिषा म्हाडगुत, मधुर पेंडूरकर, खुशी वाईरकर, जय हडकर, पराग महाभोज, मिथील गुराम यानी सुंदर कथा सांगितल्या. श्लोक चांदरकर याने आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैष्णवी लाड यानी केलेसर्व सहभागी मुलाना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.या समारंभास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, प्रियांका भोगटे, पालक व मुले उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स