कडावलच्या डाॅ .सौ. प्रिया साईनाथ खोत कुटुंबियांचे आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी केले सांत्वन.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कडावलचे शिवसेना पदाधिकारी साईनाथ खोत यांच्या पत्नी डॉ.सौ. प्रिया साईनाथ खोत यांचे अकाली निधन झाल्याने खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन खोत कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते,जिल्हाप्रमुख सतीश सावंत,कडावल सरपंच शितल कल्याणकर, संदीप सावंत,गुरुनाथ मुंज उपस्थित होते. सौ. खोत यांचे पूर्वाश्रमीचे नाव प्रिया कमलाकर पाटील असे असून त्याच नावाने त्या कडावल भागात परिचित होत्या. गोरगरीब रुग्णांना चांगल्याप्रकारे सेवा देत. वेळप्रसंगी रुग्णाच्या घरी जाऊन सेवा देत. त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. आजारी माणसाकडे पैसा असो वा नसो त्या उपचार करीत असत अशी त्यांची जनमानसात ओळख आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)