ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सांगुळवाडी येथे ९ मे पासून धार्मिक कार्यक्रम....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सांगुळवाडी येथे ९ मे पासून धार्मिक कार्यक्रम....!

प्रकाशन: 04 May 2023 02:32 PM
वाचन संख्या 108

श्री भगवती देवी मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार संपन्न..

वैभववाडी/ सहिष्णू पंडित: वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील श्री भगवती देवी मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण, मूर्तीप्रतिष्ठापना सोहळा मंगळवार ९ मे ते गुरुवार ११मे रोजी होणार आहे.

मंगळवार दि. ०९ मे. मिती वैशाख कृ. ४ सकाळी ८.३० ते १.३० जलयात्रा, देवतांना आवाहन, महागणपती पूजन, अग्नी स्थापना, मुर्तीची शुध्दी, वास्तु होम, दुपारी १.०० ते १.३० महाआरती, दुपारी १.३० ते ३.०० महाप्रसाद. दुपारी ३.०० ते ७.०० होम मिनिस्टर (फक्त महिलांसाठी)सायं. ७.०० ते ९.०० सुस्वर भजन: ओंकार प्रासादिक भजन मंडळ, फोंडाघाट, रात्रौ ८.०० ते ९.३० महाप्रसाद, रात्रौ ९.०० ते १०.३० संगीत भजन: बुवा श्री. अजित गोसावी श्री सौभाग्यलक्ष्मीसोनू संगीत साधना प्रा.भ.मं. तिवरे, रात्रौ १०.०० नंतर श्री देवी भगवती क्रिकेट संघ आयोजित, क्रिकेट स्पर्धा (अंडरआर्म ) स्थानिक खेळाडू

बुधवार दि. १० मे. मिती वैशाख कृ. ५, सकाळी ८.३० ते १.०० स्थलशुद्धी, स्थापित देवतांचे पूजन, मुख्य देवता हवन, जलधारा, दुपारी १.०० ते १.३० महाआरती व प्रार्थना दुपारी १.३० ते ३.००, महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ७.०० होम मिनिस्टर (फक्त महिलांसाठी), सायं. ७.०० ते ९.०० सुस्वर भजन: बुवा श्री. अमेय आर्डेकर श्री मेजारेश्वर प्रा. भ. मंडळ नागवे, कणकवली, रात्रौ ८.०० ते ९.३० महाप्रसाद, सायं.९.०० ते ११.०० सुस्वर भजन: बुवा श्री. योगेश पांचाळ श्री विश्वकर्मा भजन मंडळ भरणी, ता. कुडाळ, रात्रौ ११.०० ते १.०० स्थानिक भजने.

गुरुवार दि. १० मे. मिती वैशाख कृ. ६ सकाळी ६.१५ ते ७.३० कलशारोहण सोहळा, प. पू. स्वामी श्री विठ्ठल राणे महाराज, दत्त दरबार सांगुळवाडी यांचे शुभहस्ते, सकाळी ७.३० ते १२.०५ स्थल शुध्दी, मुर्तीची मिरवणूक, प्रवेश व प्राणप्रतिष्ठा, अभिषेक, महाआरती, समारोप, दुपारी १.३० ते ३.०० महाप्रसाद, सायं. ४.०० ते ६.०० पालखी मिरवणूक, सायं. ६.०० ते ८.०० सत्कार सोहळा व आभार प्रदर्शन सन्माननीय अतिथी यामध्ये आमदार श्री. नितेश राणे कणकवली, वैभववाडी, देवगड मतदार संघ, आमदार श्री. राहुल पाटील साहेब परभणी मतदार संघ, श्री. भास्कर शंकर विचारे डायरेक्टर रिचमंड ग्रुप ऑफ कंपनी, भांडूप – मुंबई, श्री. भालचंद्रसिंह केशवराव रावराणे चेअरमन, एमडी, सीपी इंडीया, युसीपी युरोप युरो इंडिया बिझनेस काउन्सिल ईआयबीसी फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडिया, श्री. अरविंद भास्कर रावराणे (सांगुळवाडी) संचालक महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई, रात्रौ ८.०० ते ९.३० महाप्रसाद, रात्रौ ९.३० ते १.०० सुश्राव्य कीर्तन ह.भ.प. सुप्रियाताई साठे, रात्रौ १.०० ते ३.०० स्थानिक भजने असा कार्यक्रम होणार आहे तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.देवी भगवती देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती सांगुळवाडी व समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स