ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
वाफोली येथील श्री देवी माऊली पंचायतन कलशारोहण वर्धापनदिन शुक्रवारी ५ मे रोजी
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वाफोली येथील श्री देवी माऊली पंचायतन कलशारोहण वर्धापनदिन शुक्रवारी ५ मे रोजी

प्रकाशन: 02 May 2023 12:32 PM
वाचन संख्या 35

बांदा /राकेश परब : वाफोली येथील श्री देवी माऊली पंचायतन कलशारोहण वर्धापनदीनानिमित्त सग्रह श्री सूक्त विधान श्री सत्यनारायण महापूजा, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी ५ मे रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी ८ वाजता गणपतीपूजन, प्रायश्चीत विधी, देवतांना नारळ विडे, पुण्याहवाचन, प्रधान देवता स्थापन पूजन, श्रीसूक्त जपाभिषेक, देवता होमहवन, कुमारिका पूजन, बलिदान, पूर्णाहुती, सत्यनारायण महापूजा, दुपारी २ वाजता महानैवेद्य, महाआरती, देवता प्रार्थना, आशीर्वाद, तिर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता ग्रामस्थांची सुश्राव्य भजने व रात्री ठीक १० वाजता श्री हेळेकर दशावतार नाट्यमंडळ कारिवडे यांचा कालचक्र हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन स्थानीक सल्लागार उपसमिती वाफोलीचे अध्यक्ष विलास गवस, प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था, मुंबई व वाफोली ग्रामस्थ यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स