ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वाफोली येथील  माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वाफोली येथील माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

प्रकाशन: 02 May 2023 12:28 PM
वाचन संख्या 51

बांदा /राकेश परब: वाफोली येथील अन्नपूर्णावाडी ते देऊळवाडी या रस्त्याच्या कामाचा आज माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी वाफोली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची श्री राजन तेली यांनी भेट घेतली.याप्रसंगी देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विविध योजनांची माहिती देत प्रत्येक योजना ही घराघरात पोहोचली पाहिजे असा कानमंत्र माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला.रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली,सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस,देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस,पोलीस पाटील आना (राजन) गवस,ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य अमित कळंगुटकर, सदस्या मंजुळा शेगडे,साक्षी शिरोडकर,सोसायटी चेअरमन धनश्री गवस,व्हा.चेअरमन अनिल गवस,माजी सरपंच मारुती गवस,अंकुश गवस,सचिन गवस,रामा गवस,एकनाथ नाडकर्णी,सुधीर दळवी,महेश धुरी,महेश गवस,गणेश गवस,महेंद्र गवस,ग्रामपंचायत कर्मचारी संदीप धुरी,लवू कांबळे, अंगणवाडी सेविका तृप्ती परब,आशा सेविका ऋतुजा गवस,बापू राणे, बाबली गवस, रविना कांबळे,मुग्धा पाटील,संगीता गवस,उज्वला कांबळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स