ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगाव येथे पाच जिल्हा मर्यादित शुटिंगबॉल स्पर्धा : मनेराजुरी सुशांत संघ उपविजेता सांगलीचा मनेराजुरी युथ संघ ओम गणेश चषकाचा मानकर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगाव येथे पाच जिल्हा मर्यादित शुटिंगबॉल स्पर्धा : मनेराजुरी सुशांत संघ उपविजेता सांगलीचा मनेराजुरी युथ संघ ओम गणेश चषकाचा मानकर

प्रकाशन: 02 May 2023 03:20 PM
वाचन संख्या 46

संतोष साळसकर | शिरगांव: शूटिंग बॉल स्पर्धेत सांगलीच्या मनेराजुरी युथ संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात मनेराजुरी सुशांत संघाला नमवून ओम गणेश चषकावर विजयी मोहोर उमटवली.देवगड तालुक्यातील शिरगाव येथील ओम गणेश क्रीडा मंडळ आणि शिरगाव हायस्कूल अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा या पाच जिल्हा पार पडल्या.

पाच जिल्ह्यातील १४ नामवंत संघात झालेल्या लढतीत अंतिम सामना सांगली जिल्ह्यातील दोन्ही संघा दरम्यान उत्कंठावर्धक चुरशीच्या लढतीत मनोराजुरी युथ संघ अंतिम विजेता ठरला. या संघाला १०,००० रुपये रोख व चषक , तर उपविजेता मनोराजुरी सुशांत संघाला ७,००० रुपये रोख व चषक , कुडाळ तालुक्यातील माणगाव व कोल्हापूर जिल्हा संघाला अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे ५००० रोख रुपये व चषक, तसेच विक्रांत स्पोर्ट शेळेवाडी, हिंगणगाव खुर्द, कळे ( कोल्हापूर ) व मातोड या अनुक्रमे ५ ते ८ क्रमांकाच्या विजेत्या संघाना प्रत्येकी २,५०० रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकांत बेस्ट शूटर संभाजी भानुसे, बेस्ट नेटमन अमर जमदाडे, बेस्ट लिफ्टर इरफान मुजावर, उत्कृष्ट कार्यकर्ता हर्षवर्धन कदम यांना गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अरविंद पाटील, बबन गवस, सुरेश पाटील, स्पर्धा नियंत्रक अशोक दाभोळकर तर सामनाधिकरी म्हणून सुरेंद्र सकपाळ यांनी काम पाहिले.

पारितोषिक वितरण समारंभास उपसरपंच अमित साटम, संदीप.साटम, सेवानिवृत्त रायगडचे वनक्षेत्रपाल संजय कदम, विनोद आईर, प्रशांत साटम, दर्पण कदम, विवेक जामसंडेकर, संकेत चव्हाण, दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, क्रिडा रसिक उपस्थित होते.*सहृदय सत्कार*शूटिंग बॉल खेळासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९ जुन्या जाणकार गुणवंत खेळाडूंचा यावेळी मंडळाच्या माध्यमातून शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सहृदय सत्कार करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स