ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. विजयकुमार राऊत यांच्या हस्ते भारतीय किसान संघाच्या देशी बियाणे बँकचे उद्घाटन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. विजयकुमार राऊत यांच्या हस्ते भारतीय किसान संघाच्या देशी बियाणे बँकचे उद्घाटन

प्रकाशन: 02 May 2023 12:24 PM
वाचन संख्या 39

भविष्यामध्ये ज्याच्याकडे बीज असेल तोच जगावर राज्य करेल”
श्री मदन देशपांडे, महाराष्ट्र प्रांत महामंत्री, भारतीय किसान संघ

कुडाळ /देवेंद्र गावडे:“मानवाच्या हस्तक्षेपाने तयार झालेल्या संकरित बियाण्यांचे आयुष्य अल्पावधी असते तर निसर्गाने तयार केलेल्या जाती हजारो वर्ष टिकतात तसेच त्यांचे पोषणमूल्य उच्च प्रतीचे असते. म्हणून पारंपारिक बियाण्यांचे जतन करणे व ते वाढवणे अत्यावश्यक आहे.यासाठी भारतीय किसान संघाच्या माध्यमातून दुर्मिळ अशा देशी बियाण्यांची बँक सुरू करण्यात आलेली आहे.”असे विचार श्री.मदनजी देशपांडे यांनी भारतीय किसान संघ,सिंधुदुर्ग च्या वतीने श्री सूर्यकांत कुंभार नेरूर देऊळवाडा येथे सुरू करण्यात आलेल्या देशी बियाणे बँक च्या उद्घाटन प्रसंगी मांडले.
बीज बँक उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व नांगर,माती, जल व बीज पूजन करून करण्यात आली. यावेळी भात, कडधान्य, भाज्या, फळे यांची ८०पेक्षा अधिक बियाणे व पारंपरिक ३१अवजारे प्रदर्शित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग श्री. विजयकुमार राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी बीज बँक उपक्रमाला शुभेच्छा देताना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमात पारंपरिक बियाणे संवर्धन करणाऱ्या श्री लक्ष्मण राणे-मळगाव, श्री शिवप्रसाद देसाई-बांदा व आनंद रावले-कट्टा यांचा सत्कार करण्यात आला.

श्री तानाजी सावंत, जिल्हाध्यक्ष,भा. कि. संघ यांनी किसान संघाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर जिल्हा बीज आयाम प्रमुख श्री.सूर्यकांत कुंभार यांनी मानवी आरोग्यासाठी विषमुक्त शेती, देशी बियाण्यांचा वापर व भूमी सुपोषण ची आवश्यकता मांडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धनंजय गावडे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्या शेतकऱ्यांना देशी बियाण्या साठी काम करायचे आहे त्यांनी श्री सुर्यकांत कुंभार ७८८७६४२९७५किंवा श्री जयवंत परब ९४०४७६५६४६ यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स