३ मे २०२३ रोजी श्री भालचंद्र केळुसकर ज्येष्ट भजनी बुवा यांना सन २०२३ चा कै शरद गरुड स्मृती कला पुरस्कार
ब्युरो न्यूज: ३ मे २०२३ रोजी श्री भालचंद्र केळुसकर ज्येष्ट भजनी बुवा यांना सन २०२३ चा कै शरद गरुड स्मृती कला पुरस्कार
श्री भालचंद्र केळुसकर ज्येष्ट भजनी बुवा यांना दिला जाणार पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या संस्थेच्या वतीने पुरस्कार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर जमातीच्या लोककलाचे जतन व प्रसार हे काम करणा-या विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेचा १७ वा वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. ३ मे २०२३ रोजी पिंगुळी येथे संपन्न होत आहे. सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत ठाकर समाजाचा वधु वर सुचक मेळावा आयोजित केला आहे. संध्याकाळी ७.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर संस्थेच्या माध्यमातुन देण्यात येणारा कै शरद गरुड स्मृती पुरस्कार २०२३ या वर्षी ज्येष्ट भजनी बुवा श्री भालचंद्र केळुसकर यांना दिला जाणार आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने या वर्षी कोकणामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम केलेल्या मान्यवर व्यक्तिंना “कोकणरत्न सन्मान २०२३” या पुरस्कार देउन गौरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी ग्रामपंचायत पिंगुळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य यांचा सत्कार केला जाणार आहे. रात्री ८.३० वाजता तेंडोलकर पारंपारीक दशावतार नाट्य मंडळ यांचे महान पौराणिक दशावतार नाटक “पुण्यप्रभाव”; हे नाटक होणार आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सर्व कलारसिक प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री परशुराम विश्राम गंगावणे पद्मश्री पुरस्कार २०२१ यांनी केलेले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)