ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बारसू रिफायनरीबाबत 'मनसे' ची सविस्तर भूमिका एक शाश्वत दृष्टीकोन दाखवू शकेल..! ( विशेष )
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बारसू रिफायनरीबाबत 'मनसे' ची सविस्तर भूमिका एक शाश्वत दृष्टीकोन दाखवू शकेल..! ( विशेष )

प्रकाशन: 26 Apr 2023 12:29 PM
वाचन संख्या 614

मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : बारसू रिफायनरीबाबत मनसेची सविस्तर भूमिका ६ मे रोजी रत्नागिरीत होणार्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे स्पष्ट करणार आहेत. ही माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते श्री.नितीन सरदेसाई यांनी दिल्यानंतर या सध्याच्या संपूर्ण राजकीय, पर्यावरणवादी, विकासाचे ध्येयवादी व सारासार सामाजिक अशा सर्व विचारांसाठी मनसे अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांची भूमिका ही कोकणसाठी शाश्वत ठरू शकते असा काही तटस्थ राजकीय तज्ञांचा अंदाज आहे.

कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप होत आहेत. विरोधकांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.बारसूचे आंदोलन चिघळल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कोकणात अशा प्रकारचे प्रकल्प येत असताना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मात्र, असे असले तरीही येथील स्थानिकांना संपूर्णपणे विश्वासात घेऊन आणि त्यांच्यांशी चर्चा करून प्रकल्प आणले पाहिजे. कोकणात आज रोजगाराच्या संधी खूपच कमी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणातील बरीचशी घरे आज रिकामी दिसतात. कारण येथील तरुण रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात असेही नितीन सरदेसाई म्हणाले. कोकणात पर्यटन आणि येथे पिकणाऱ्या काजू आणि आंब्यासारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोकणात आले पाहिजेत असे ते म्हणाले.

मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांचा दृष्टीकोन का महत्वाचा ठरू शकतो यांवर थोडा विचार केला तर एक लक्षात येईल की मनसे या पक्षाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत बाकी अनेक राजकीय फाटाफूट, विचार धारेतील बदल घडत असताना श्री. राज ठाकरे यांनी रोजगार व पर्यावरण या दोन गोष्टींवर जोर देत मनसेची एक ठोस भूमिका कधीच बदलली नाही आहे. नाशिकला सत्ता प्राप्तीनंतर तिथले बदलही जनतेने अनुभवले परंतु कालांतराने संख्येच्या राजकारणात मनसे स्थीर होऊ शकली नव्हती तरिही मनसेने पर्यावरण व रोजगार विषयक भूमिका बदललेली नाही…अगदी आजपर्यंत. अगदी अलिकडच्या काळात ‘मनविसे’ च्या नवीन फळीने हाती घेतलेले छोटे छोटे सामाजिक प्रकल्प सुद्धा कुठेतरी राजकीय ईर्षेपेक्षा ‘काहीतरी सामाजिक करायचंय’ असा बोलका संदेश देतात हे कित्येक विरोधकही न बोलता मान्य करत असतीलच.

मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी स्थानिक कृषी,बागायती,मत्स्य व पशू-पक्षी पालन आधारीत प्रकल्पांकडे त्यांचा दिशा निर्देश केलेला आहे हे श्री. नितीन सरदेसाई यांच्या माहिती वरुन स्पष्ट होते. ‘स्थानिक लोकांना काय हवे आहे व त्यानुसार प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी’ हा मनसेचा पहिल्यापासूनच दृष्टीकोन आहे परंतु आजची राजकीय स्थिती व रोज बदलती राजकीय समीकरणे, इच्छा यांची योग्य सांगड घालून श्री.राज ठाकरे हे अभ्यासपूर्ण भूमिका मांडतीलच अशी तटस्थ राजकीय तज्ञांना खात्री आहे.

आंदोलने,मोर्चा याही पुढे जात सध्या मनसे काम करते असे मनसेचे तळागाळातील कार्यकर्ते,पदाधिकारी गेली काही वर्षे सिद्ध करत आलेत. ग्रामपंचायत स्तरावर मनसेच्या जागांची संख्या सुद्धा वाढली असल्याचे लक्षात येते आणि ग्रामपंचायत स्तर हाच खरा देशाचा सर्वात शुद्ध ‘स्थानिक स्तर’ असल्याने मनसेची भूमिका ही रिफायनरीबाबतच्या दृष्टीकोनाची बिजं ठरू शकते.
त्यामुळे ६ मे रोजीच्या मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या रत्नागिरीच्या सभेची कोकणवासिय आणि राजकीय विश्लेषकांना नक्कीच ‘शाश्वत आधाराच्या दृष्टीकोनाची’ उत्कंठा असेल. रिफायनरीशिवायही विकास होऊ शकत असेल किंवा रिफायनरीशिवाय विकास व रोजगार शक्यच नाही अशा दोन्ही विचारधारांसाठी ‘६ मे ‘ ची सभा ही राजकीय सभेपेक्षा सामाजिक कार्यशाळा ठरेल का हे ही पहाणे महत्वाचे ठरेल.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स