पंजाबचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बद्दल यांचे मोहालीत निधन.
दिल्ली | ब्युरो न्यूज : पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) चे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंग बादल यांचे आज संध्याकाळी ८ वाजताच्या दरम्यान मोहालीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
प्रकाशसिंग बादल यांनी ५ वेळा पंजाबचे मुख्यमंत्री पद भूषविले होते. .
प्रकाशसिंग बादल यांचा जन्म ८ डिसेंबर १९२७ रोजी पंजाबमधील अबुल खुराना या छोट्या खेड्यातील जाट शीख़ कुटुंबात झाला होता. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल हे त्यांचे पुत्र आहेत.
कोविड नंतरच्या आरोग्य तपासणीसाठी त्यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. बादल यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कोरोना विषाणूची लागण देखील झाली होती. त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर भारतातून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)