ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
राज्य शासनाचा 'पहिले पाऊल' हा राज्यस्तरीय मेळावा शिक्षण विभाग महाराष्ट्र  शासन व  प्रथम एज्युकेशन संस्था यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा नं.१ केंद्र  शाळेत
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

राज्य शासनाचा 'पहिले पाऊल' हा राज्यस्तरीय मेळावा शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व प्रथम एज्युकेशन संस्था यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा नं.१ केंद्र शाळेत

प्रकाशन: 24 Apr 2023 05:41 PM
वाचन संख्या 37

बांदा /राकेश परब: इयत्ता पहिलीतील शाळा प्रवेश हा मुलांच्या जीवनातील संस्मरणीय बनावा तसेच मुलांना शाळेप्रती गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात येतो. यावर्षी राज्य शासनाचा ‘पहिले पाऊल’ हा राज्यस्तरीय मेळावा शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व प्रथम एज्युकेशन संस्था यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा नं.१केंद्र शाळेत येथे गुरुवार दि.२७ रोजी सकाळी ८ वाजता राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माझी ई शाळा या उपक्रमाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद बांदा या केंद्र शाळेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १८५३साली झाली असून १७०वर्षे झालेल्या व जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या शाळेला राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. या मेळाव्यात पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक व जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, विभागीय शिक्षण उपसंचालक, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, डाएटच्या प्राचार्या अनुपमा तावशीकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांच्यासह राज्यातील शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स