आर्या राणे सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत देवगड तालुक्यात प्रथम
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: इयत्ता चौथी व सातवीच्या विध्यार्थ्यां साठी जी. प. शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेतदेवगड तालुक्यातील हिंदळे नंबर १ शाळेची सातवीतील विध्यार्थीनी आर्या अतुल राणे हिने देवगड तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिला २२० गुण प्राप्त झाले आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्यां मध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी , स्पर्धात्मक अभ्यासाची सवय लागावी तसेच शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची आवड लागावी या उद्देशाने सदर परीक्षा घेण्यात येते. आर्या हिचा महा. राज्य प्राथमिक शिक्षक समिती देवगड शाखेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. आर्या हिच्या यशा बद्दल कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)