ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
१४५ व्या स्वामी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

१४५ व्या स्वामी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 14 Apr 2023 01:32 PM
वाचन संख्या 48

धर्म संकीर्तनसह पारंपारिक धार्मिक कार्यक्रम व पालखी सोहळ्याचे आयोजन : मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात १४५ व्या स्वामी पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. यंदा
श्री स्वामी समर्थांची १४५ वी पुण्यतिथी मंगळवार दिनांक १८ एप्रिल रोजी आहे. या पुण्यतिथी महोत्सवात स्वामींच्या नित्य उपासने सोबतच सालाबादाप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने नगरप्रदक्षिणा, नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन, नित्य नामस्मरण दिनांक ७ एप्रिल ते १७ एप्रिल अखेर सकाळी ८ ते ११ या वेळेत विश्वस्ता श्रीमती उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली गुरुलीलामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण, दिनांक ११ एप्रिल ते १८ एप्रिल अखेर अखंड नामवीणा सप्ताह, व दिनेश मावडीकर (पुणे) यांचे सकाळ संध्याकाळी सनई वादन तसेच दिनांक ७ एप्रिल ते १७ एप्रिल अखेर दुपारी १२ ते ४ या वेळेत स्थानिक व परगावच्या भजनी मंडळांची भजन सेवा दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत धर्मसंकीर्तन महोत्सवात दिनांक १४ एप्रिल रोजी पुण्यातील विजयालक्ष्मी शिरगावकर यांची अभंगवाणी, तसेच सोलापुरातील विलासराव कुलकर्णी यांची भक्तीसंगीत सेवा, दिनांक १५एप्रिल रोजी इंदौर मधील तृप्ती कुलकर्णी, रजत पवार व सहकाऱ्यांची सुगम संगीत व भक्तिनृत्य सेवा, दिनांक १६ एप्रिल रोजी डोंबिवलीतील मानसी अत्रे व सहकाऱ्यांची कथक नृत्य सेवा, दि.१७ एप्रिल रोजी रोहा येथील ह.भ.प.अंजली कवळे यांची नारदीय कीर्तन सेवा इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील. दि.१८ एप्रिल श्री स्वामी पुण्यतिथी रोजी पहाटे २ वाजता श्रींची काकड आरती,
नगरप्रदक्षिणा, नामस्मरण, पहाटे ४ ते ६ लघुरुद्र, सकाळी ६ वाजता नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा, सकाळी ७ वाजता देवस्थानचे स्वामींना अभिषेक, सकाळी ११ वाजता मंदिर समिती पुरोहितांची नैवेद्य आरती, अक्कलकोट राजघराण्याचे स्वामींना महानैवेद्य आरती, दर्शन, दुपारी १२ ते ४ या वेळेत भाविकांना महाप्रसाद, तसेच दुपारी २ ते ४ या वेळेत कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापुर्ती पदयात्रेकरुंची कोल्हापूरच्या महाद्वार श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाची श्री वटवृक्ष मंदिर परिसरात भजन सेवा संपन्न होईल. सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत शहरातून पालखी सोहळा, दि.१९ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत गोपाळकाला इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार संपन्न होणार आहेत. याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी परंपरेनुसार सर्व धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा संपन्न होणार आहेत. श्री स्वामी समर्थाचा पुण्यतिथी महोत्सव म्हणजे तमाम स्वामी भक्त व अक्कलकोट वासियांच्या स्वामी भक्तीचा लोकोत्सव आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी श्रींचे नित्य दर्शन व धार्मिक कार्यक्रमांबरोबर श्रवण, मनन, चिंतन, दर्शन, प्रसाद, पालखी सोहळा इत्यादी श्री.सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स