ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वाजत गाजत सुरू केलेली अनियमित विमान सेवा सुधारावी अन्यथा पूर्णतः बंद करावी ;महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकलचरचे को चेअरमन श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची मागणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वाजत गाजत सुरू केलेली अनियमित विमान सेवा सुधारावी अन्यथा पूर्णतः बंद करावी ;महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकलचरचे को चेअरमन श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची मागणी.

प्रकाशन: 14 Apr 2023 01:48 PM
वाचन संख्या 135

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मुंबईहून सिंधुदुर्गसाठी उत्साहात सुरू झालेल्या विमानसेवेचे आता रडगाणे सुरू झाले आहे. कधी विमान रद्द, तर कधी खूप मोठा विलंब याचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. ११ एप्रिल रोजी सुद्धा मुंबई वरून सिंधुदुर्ग मध्ये येणारे विमान अकस्मात रद्द केल्याने याचा फटकामहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकलचरचे को चेअरमन , उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना बसला. विमान रद्द झाल्याची कोणतीही सूचना प्रवासापूर्वी वेळेत दिली जात नाही ही सुद्धा बाब संतापजनक अशीच आहे. एखादा रुग्ण सिंधुदुर्ग मधून मुंबई येथे जात असल्यास विमान रद्द झाल्यास प्रसंगी जीवावर सुद्धा बेतणार आहे. सुरू होणारा पर्यटन हंगाम पाहता सदर अनियमित असणारी विमान सेवा सुधारावी अन्यथा पूर्णतः बंद करावी अशी मागणी उद्योजक डॉ दीपक परब यांनी केली आहे. मागील दहा दिवसांत या सेवेला दोन्ही बाजूंनी निम्म्याहून अधिक वेळा विलंब झाला आहे. कोकणला हवाईमार्गे जोडण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने ‘उडान’ योजनेंतर्गत मुंबई- सिंधुदुर्ग अशी वाहतूक चालू केली आहे. ही सेवा ‘उडान’ अंतर्गत असल्याने धोरणानुसार त्याचे दर १,८०० ते २,२०० रुपयांच्या नियंत्रणात राहणे अपेक्षित होते. पण, या सेवेसाठी प्रवाशांना किमान २,८५५ तर अनेकदा १० हजार ते १२ हजार रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र आहे. या विमान सेवेमध्ये प्रवाशांना अनेकदा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे विमान मुंबईहून सकाळी ११.४० वाजता सुटते व त्याच दिवशी परत येते. सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ शहरापासून बाहेर आहे. या स्थितीत मागील आठवड्यात दुपारी सुटणारे हे विमान दाखल झाल्यावर एक तासाने रद्द झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे परत मुक्कामाच्या ठिकाणी जाताना तारेवरची कसरत करावी लागली. मुंबईहून सुटताना विमानाचा विलंब ठरलेला असतो. एकूणच विस्कळीत अशी ही विमानसेवा आहे.’ग्लोबल कोकण’ चे संस्थापक संजय यादवराव यांनी देखील या विमानसेवेबाबत गांभीर्याने विचार करावा असे सुचवले आहे. विमान तिकीट साठी जास्तीची रक्कम मोजण्याची तयारी जिल्हावासीयांची आहे. कारण अत्यावश्यक वेळी जिल्ह्यात येण्यासाठी विमानसेवा महत्वाची ठरत आहे. परंतु पैसे मोजून सुद्धा नियमित वेळेत सेवा मिळत नसल्याने विमानसेवा मृगजळच ठरत आहे. दरम्यान सदर विमानसेवा वेळेत व नियमित होण्यासाठी केंद्रीय हवाई मंत्रालयाने प्राधान्याने उपाय योजना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकलचरचे को चेअरमन, उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स