डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तच्या रॅलीच्या समारोपानंतर परतताना विरार मध्ये भीषण दुर्घटना ; दोघांचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी.
मुंबई | ब्यूरो न्यूज : मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यात येत आहेत. यंदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात ही जयंती साजरी केली जात आहे. आतषबाजी आणि मिरवणूक काढून अनुयायांनी ही जयंती साजरी केली. यावेळी मिरवणुकीदरम्यान विरार मध्ये एक भीषण दुर्घटना घडली.
मुंबईजवळ लागून असलेल्या विरार परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान भीषण अपघात झाला. रॅलीदरम्यान विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. विरारच्या मनवेलपाडा ते कारगिल परिसरात ही रॅली मध्यरात्री काढण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच विरारचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास केला आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
झोनल डीसीपी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार रॅली संपल्यानंतर मनवेलपाडा भागातून कारगिल अनुयायी जात असताना हा संपूर्ण प्रकार घडला. रॅलीमध्ये रथावरील ध्वज विजेच्या तारेला लागला. त्यातून करंट पास झाला आणि रथ ढकलणाऱ्या लोकांना विजेचा शॉक लागला.
कागगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणूक वाहनावर (ट्रॉली) ६ जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉड जवळील ट्रान्सफॉर्मरला लागला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील ६ जण होरपळले. त्यातील रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला . तर ४ जण जखमी झाले. त्यातील उमेश कनोजिया (१८). राहुल जगताप (१८), सत्यनारायण (२३) ३ गंभीर जखमींना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्मित कांबळे (३२) या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)