ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण तालुक्यातील सुंदर गांव म्हणून गोळवणची निवड ; सरपंच सुभाष लाड यांची माहिती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण तालुक्यातील सुंदर गांव म्हणून गोळवणची निवड ; सरपंच सुभाष लाड यांची माहिती.

प्रकाशन: 14 Apr 2023 11:16 AM
वाचन संख्या 201

आता प्रतिक्षा जिल्ह्यातील सर्वात ‘सुंदर गांव’ घोषणेची.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गांव (स्मार्ट ग्राम) योजना” सन २०२१-२२ मध्ये ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवल ची मालवण तालुक्यात प्रथम क्रमांकाने निवड झाल्याची माहिती सरपंच सुभाष लाड यांनी दिली आहे. तालुका स्तरावरून १० लाख रुपये बक्षिस रक्कम मिळणार आहे. ह्या ग्रामपंचायतची जिल्हा स्तर समितीची तपासणी १८ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

कुडाळ तालुक्यातून तुळसुली नारूर, देवगड मधून दाभोळे, वेंगुर्ले मधून परुळे बाजार,दोडामार्ग मधून झोळंबे, कणकवली मधून लोरे, वैभववाडी मधून अरुळे, सावंतवाडी मधून निरवडे या गावांची तालुका स्तरावर निवड झाली आहे. या सर्व ग्रामपंचायतींची तपासणी पुढील आठवड्यात होणार असून त्यानंतर जिल्ह्यातील सुंदर गाव घोषित करण्यात येणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स