उद्या दिनांक ३ ऑक्टोबर रोजी मसुरे येथील उभादेव डाळप कार्यक्रम ...
सेवा बजावण्यास उत्सुक भाविकांना उपस्थित रहायचे आवाहन…
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कोकणातील विविध देवस्थानांचे गावर्हाटीविषयक कार्यक्रम ही अत्यंत महत्वाची ग्राम स्तरावरची धार्मिक गतिविधी असते. मसुरे गावातील गावऱ्हाटिशी संबंधित श्री उभादेव डाळप कार्यक्रम रविवार ३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ७.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी धार्मिक कार्यक्रमा सह नवसबोली व नवसफेड आदी कार्यक्रम होणार आहेत. ज्यांना सेवा बजावयाची आहे त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभुगांवकर व संग्राम प्रभुगांवकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)