ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तांबुळी येथे वनखात्याकडून वन्यजीव सप्ताह साजरा..

तांबुळी येथे वनखात्याकडून वन्यजीव सप्ताह साजरा..

प्रकाशन: 02 Oct 2021 08:00 PM
वाचन संख्या 142

वन्यजीवांचा हक्काचा अधिवास जपण्याचे केले आवाहन

बांदा |राकेश परब : कोकणात प्रचंड जैवविविधता आहे. परंतु वाढते शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यांसारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी संबधच येत नाही. सद्याच्या दगादगीच्या जीवनात माणसांला फारसा वेळ नसल्याने माणूस वनजीवांच्या माहीतीपासून दुर ओढवत चालला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठीच तसेच वन्य जीवाचे रक्षण होण्यासाठी, नवीन युवा पीढीला आनंद घेण्यासाठी या ‘वन्यजीव सप्ताह’ १ ते ७ आक्टोंबर निमित्ताने साजरा करण्यात येत असल्य‍ाचे बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी सांगितले. बांदा वनपरिमंडळ अंतर्गत तांबुळी ग्रामपंचायत येथे शनिवारी ‘वन्य जीव सप्ताह’ साजरा करण्यात आला. त्यावेळी ग्रामस्थांना वनवन्य जिवांबद्दल माहिती मेस्त्री बोलत होते.
जंगल सीमेवरील स्थानिकांना याबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन व सुविधा पुरवावी तसेच वन्यजीवांबद्दल माहिती मिळवून त्यांचा जीवनक्रम समजून घ्यावा, ज्यामुळे त्यांच्या बद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात. तसेच वन्यजीवांचा अधिवास असलेले जंगल तोडण्यास नेहमी विरोध दर्शवावा असे तांबुळी सरपंच अभिलाष देसाई यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरपंच तांबुळी अभिलाष देसाई,बांदा वनपाल अनिल मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ, सर्व वन कर्मचारी उपस्थित होते. शेवटी सरपंच देसाई यांनी आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स