ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बालपणाचा वृद्धत्वाला एक असाही आश्वासक हात...!

बालपणाचा वृद्धत्वाला एक असाही आश्वासक हात...!

प्रकाशन: 02 Oct 2021 06:25 PM
वाचन संख्या 266

तारकर्ली गावातील बालसंस्कारांची सलग तिसर्या वर्षी सामाजिक दायित्वाची प्रचिती ..

मालवण | वैभव माणगांवकर : विशेष वृत्त : देशामध्ये कोरानाची तिसरी लाट, भविष्याच्या चिंता,समाजातील ज्येष्ठ नागरीकांची काही ठिकाणी होत असलेलीआबाळ वगैरे चर्चांना सगळीकडे उधाण आलेले असताना तारकर्ली गावातील बाळ गोपाळांनी मात्र समाजासमोर पुन्हा एकदा एक आदर्श प्रस्थापित केला .
तारकर्ली गावातील कु. रोहन नरेश कांदळगावकर , कु. यज्ञेश वंदन केरकर , कु.वेदांत सदाशिव सागवेकर , कु. ईशान सदाशीव सागवेकर ,कु . प्रणित भार्गव कांदळगावकर , कु. निनाद गणपत मोंडकर , कु. ॠषभ श्रीधर खराडे , कु.हार्दिक सतिश टिकम , कु. सिद्धेश नरेश टिकम व कु. नैतिक धोंडी कांदळगावकर ,‌ कु . रोहित बाळकृष्ण वरक आणि कु . देवेश पराडकर या बाळगोपाळांनी गणेशोत्सवा दरम्यान आपल्या बालभजन मंडळा मार्फत गणेश भजन करून त्यातुन गोळा झालेल्या निधी मधील काही भाग तारकर्ली गावातील श्रीमती मीना महादेव बटाव या गरजु महिलेस मदत म्हणुन दिला . त्यामुळे कोरोना काळात या महिलेचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे . 
यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी रवि टिकम या आजारी तरूणाला आर्थिक मदत तसेच गावातील निराधार आणि गरजु महिलांना आर्थिक मदत केली होती  व यासाठी‌ त्यांना कामानिमित्त सौदी अरेबिया येथे वास्तव्यास असलेल्या श्री . प्रदिप तोंडवळकर यांनी ५००० रूपयांचे प्रोत्साहनात्मक बक्षिस पाठवले होते .हे बाळगोपाळ आपल्या नकळत्या वयात सुद्धा अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशीत ते कौतुकाचा विषय ठरत आहेत.
या उदाहरणांवरून तारकर्ली पंचक्रोशीतील सामाजिक दायतित्वाच्या बालसंस्कारांची प्रचिती येत असल्याची भावना तारकर्ली, देवबाग आणि मालवणवासियांतून व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स