ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरेच्या वैभवी पेडणेकरला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान 2023 जाहीर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरेच्या वैभवी पेडणेकरला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान 2023 जाहीर

प्रकाशन: 08 Apr 2023 08:52 PM
वाचन संख्या 32

मसुरे | प्रतिनिधि : मसुरे गावची कन्या आणि एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेज कणकवलीची कॉम्प्युटर सायन्स शाखेची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान http://localhost/news/public/uploads/2023 हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिनांक 9 एप्रिल http://localhost/news/public/uploads/2023 रोजी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सनी चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई, श्वेतगंध सोशल फाउंडेशन डोंबिवली, समृद्धी पब्लिकेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय कर्तुत्व ज्योतिरमय सदभावना राज्यस्तरीय संमेलन ठाणे येथे 9 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे संपन्न होणार आहे. या संमेलन मध्ये वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान http://localhost/news/public/uploads/2023 देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री उर्मिला डांगे, डॉक्टर सनी शंकर वालीका अध्यक्ष सनी चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई, ऍडव्होकेट सदाशिव काळे (मुंबई हायकोर्ट) अध्यक्ष निवड समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वैभवी पेडणेकर ही मसुरे गावची कन्या असून आतापर्यंत तिला विविध तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच कराटे या क्रीडा प्रकारात तिने जिल्हा, राज्य, आंतरराज्य, स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केली आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये विविध गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, गरीब विद्यार्थ्यांच्या शालापयोगी गरजा पूर्ण करणे, अशा सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य केले आहे. आपल्या प्रत्येक वाढदिवसाला पाच गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्य म्हणून दत्तक घेतले आहे. तसेच शालेय क्रीडा प्रकार, कथाकथन स्पर्धा, काव्य स्पर्धा,नाट्य,नृत्य अशा विविध स्पर्धांमध्ये सुद्धा नावलौकिक प्राप्त केला आहे. वैभवी ही उत्कृष्ट महिला दशावतार नाट्य कलाकार आणि प्रसिद्ध नृत्यांगना सुद्धा आहे. तिच्या या कार्याची दखल महाराष्ट्र मधील अग्रगण्य आशा सनी चारिटेबल ट्रस्ट नवी मुंबई, श्वेतगंधा सोशल फाउंडेशन डोंबिवली आणि समृद्धी पब्लिकेशन महाराष्ट्र या नामवंत अशा ट्रस्ट ने घेऊन तिला सन http://localhost/news/public/uploads/2023 चा महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करून अनोखा गौरव केला आहे. तिच्या या यशाबद्दल मसुरे गावात, आणि एस एस पी एम कणकवली कॉलेज कडून कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल उद्योजक डॉ. दीपक परब, उद्योजक दीपक सावंत, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, उद्योजक निनाद धुरी, माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी जि प अध्यक्ष सरोज परब, मर्डे सरपंच संदीप हडकर, उद्योजक नंदू दादा परब, महेश बागवे, विलास मेस्त्री, चित्रपट निर्माते संतोष परब, बाबा परब, उपसरपंच पिंट्या गावकर यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स