ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळेरे येथील डॉ.ऋचा मिलिंद कुलकर्णी यांना आरोग्यलक्ष्मी पुरस्कार प्रदान
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तळेरे येथील डॉ.ऋचा मिलिंद कुलकर्णी यांना आरोग्यलक्ष्मी पुरस्कार प्रदान

प्रकाशन: 08 Apr 2023 08:56 PM
वाचन संख्या 39

संतोष साळसकर | शिरगांव: तळेरे येथे आरोग्य सेवा देणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.ऋचा कुलकर्णी यांना निरामय विकास केंद्र, कोलगाव यांच्याकडून चौदाव्या वर्धापनदिनी डॉ.शालिनी सबनीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “आरोग्यलक्ष्मी पुरस्कार” देण्यात आला. यावेळी निरामय विकास केंद्रांचे सदस्य तसेच डॉ.शमीता बिरमोळे , डॉ प्रवीण बिरमोळे, डॉ. गौरी गणपत्ये, डॉ. स्वार, डॉ. बलराज व डॉ.उज्वला येळकोटे, डॉ.चिंदक आदि उपस्थित होते. तळेरे सारख्या छोट्या गावात १९९६ ला फारसी सुविधा नसतांना आरोग्य सेवा चालू करून दोन पिढ्याचे आरोग्यरक्षण केल्याबद्दल हा पुरस्कार कृतज्ञता म्हणून देण्यात आला. यावेळी डॉ. ऋचा कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत प्रसाद घाणेकर यांनी घेतली.सत्काराला उत्तर देताना डॉ. ऋचा यांनी त्यांच्या MD ऍडमिशन वेळी भयानक मुंबई दंगल चालू असतानाही मुंबईत जाऊन त्यांनी एक महत्वाचे सर्टिफिकेट कसे मिळवले, त्याची चित्तथरारक गोष्ट सांगितली. त्यावेळी आई व जवळच्या तसेच अनोळखी लोकांनीही कसे साहाय्य केले याचे त्यांनी वर्णन केले.ग्रामीण भागातच सेवा द्यायची म्हणून १९९६ ला तळेरे मध्ये आल्यावर सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. त्यावेळी पती डॉ.मिलिंद यांची साथ लाभली. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम व आपल्या मुलीचे संगोपन या द्विधेत माझ्या सासूबाई यांच्यामुळेच मी मार्ग काढू शकले म्हणून हा पुरस्कार मी माझ्या सासूबाई यांना अर्पण करत आहे, असे त्या म्हणाल्या.त्याकाळी एचआयव्हीचे पेशन्ट प्रचंड प्रमाणात होते. त्यांना सेवा देताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले.त्याकाळात पेशंटच्या संपर्कात असल्याने स्वतःलाही त्याची लागण व्हायची भीती वाटत असे व त्या दर सहा महिन्याला आपली सुद्धा टेस्ट करून घेत पण सुदैवाने तसे काही झाले नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व साडी श्रीफल असे असून ट्रस्टी डॉ.अनघा सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स