ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
गोळवण मध्ये बंद घरास लागली आग !
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गोळवण मध्ये बंद घरास लागली आग !

प्रकाशन: 05 Apr 2023 09:34 PM
वाचन संख्या 24

मसुरे | प्रतिनिधी: गोळवण धवडकीवाडी येथील रहिवासी व नोकरीनिमित्त मुंबई येथे राहत असलेल्या श्री.अरूण  सहदेव धारपवार यांचे राहते घर सोमवारी रात्री अडीज वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत जळाले आहे. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घरात कोणीही नसल्यामुळे अनर्थ टळला. लागलेल्या आगीत लाकडी छप्पर सह घरात उभी असलेली प्लेझर दू चाकी जळून खाक झाली. घरात असलेले सर्व साहित्य, कपडे तसेच छप्पराचे लाकडी सामान जळून सुमारे अडीज लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागलेली समजताच वाडीतील सर्व मंडळींनी आग विझवण्याचे आतोनात प्रयत्न करून आग विझवली. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.यावेळी  सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, ग्रा. पं. सदस्य श्री. विरेश पवार, तलाठी श्री. कांबळे , पोलिस पाटील श्री. राजेंद्र चव्हाण, तसेच गोळवण येथील ग्रामस्थ श्री. नंदू नाईक, श्री. भाई चिरमुले, श्री. संदेश पवार, श्री. अशोक धारपवार, श्री. दिनेश कदम, श्री. राजेंद्र धारपवार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स