ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मातृभूमी शिक्षण संस्था आयोजित शिवसंस्कार २०२३ या स्पर्धेत बांदा येथील विद्यार्थ्यांनी सुयश
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मातृभूमी शिक्षण संस्था आयोजित शिवसंस्कार २०२३ या स्पर्धेत बांदा येथील विद्यार्थ्यांनी सुयश

प्रकाशन: 05 Apr 2023 09:29 PM
वाचन संख्या 49

बांदा /राकेश परब: मातृभूमी शिक्षण संस्था आयोजित शिवसंस्कार २०२३ या स्पर्धेत बांदा येथील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त करून विविध स्पर्धेतील यशाची परंपरा कायम राखली आहे.

मातृभूमी शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराज यांचे विचार रुजावेत यासाठी महाराष्ट्र, गोवा ,गुजरात व कर्नाटक या च्या राज्यासाठी आंतरराज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला होता .या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना साखळी गोवा येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेत गणोजी शिर्के यांची भूमिका साकारणारे अभिनेते स्वप्नील राजशेखर, डॉ. सोनल लेले, गणेश ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. या आंतरराज्यस्तरीय स्पर्धेत बांदा केंद्रशाळेतील इयत्ता दुसरीतील सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर या विद्यार्थ्याने पोवाडा गायन स्पर्धेत चारही राज्यातून प्रथम क्रमांक तसेच वेशभूषा स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला प्राप्त केला होता. इयत्ता पाचवी शिकणाऱ्या नैतिक निलेश मोरजकर या विद्यार्थ्याने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. तसेच इयत्ता चौथीतील निल नितीन बांदेकर या विद्यार्थ्याने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता. या यशस्वी विद्यार्थ्यांना शिवप्रतिमा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या विद्यार्थ्यांना बांदा केंद्र शाळेचे शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स