ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सनराईज सामाजिक संस्था आडवली रक्तदान शिबीरात उत्स्फूर्त प्रतिसाद....!

सनराईज सामाजिक संस्था आडवली रक्तदान शिबीरात उत्स्फूर्त प्रतिसाद....!

प्रकाशन: 05 Apr 2023 09:24 PM
वाचन संख्या 80

27 रक्तदात्यांसह 6 दुर्मिळ व 2 नविन रक्तदात्यांनी केले रक्तदान

चिंदर/विवेक परब : मालवण तालुक्यातील सनराईज सामाजिक संस्था आडवलीच्यावतीने कै. संजय राऊळ यांच्या स्मरणार्थ आज सुभाष विद्यालय आडवली येथे झालेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरास 27 रक्तदात्यांन सह 6 दुर्मिळ रक्तदाते व 2 नवीन रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख श्री. जंगले यांच्या हस्ते झाले. सनराईजचे क्रियाशील कार्यकर्ते मिलिंद चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात कै.संजय राऊळ यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच सनराईज संस्थेच्या माध्यमातून रक्तदानाविषयी करत असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच केंद्रप्रमुख जंगले यांनी आपल्या मनोगतातून सनराईज सामाजिक संस्थेने रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याबद्दल कौतुक करत नियमित रक्तदानाचे महत्त्व विशद केले.

रक्तदान आणि वाढदिवस यांचा योग जुळून आल्याने बांदीवडे येथील नियमित रक्तदाते शाहुलखन बांदिवडेकर याचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच जिल्हा रक्तपेढीच्या वतीने शाहुलखन यांना विशेष सन्मान करून गौरविण्यात आले. शाहुलखन बांदिवडेकर यांचे आजचे 35 वे रक्तदान होते.

या वेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालय रक्तपेढी विभागाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पद्मश्री हळदणकर, सुभाष विद्यालय चे श्री. हजारे सर, सनराईज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. गणेश मालंडकर, जिल्हा रक्तपेढीच्या अधिपरिचारिका श्रीम.प्रांजली परब, टेक्निशियन श्रीम. मयुरी शिंदे, श्री.सुहास डोंगरे, श्री.नंदकुमार आडकर,श्री. नितीन गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी सनराईज संस्थेचे अध्यक्ष गणेश मालंडकर, उपाध्यक्ष तुषार चव्हाण, सुबोध चव्हाण, मिलिंद चव्हाण, मयूर चव्हाण, सागर परब, प्रथमेश परब, प्रणय चव्हाण, शाहुलखन बांदिवडेकर, अर्चित लेले यांनी मेहनत घेतली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स