कांदळगाव सरपंच रणजीत परब यांना पितृशोक
मसुरे | प्रतिनिधी :कांदळगाव खांबडवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ नारायण साबाजी परब (७९) यांचे राहत्या घरी निधन झाले. ते १९८४ ते १९९७ पर्यंत वीस वर्ष कांदळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य होते. काही वर्षे गावचे पोलीस पाटील पदही त्यांनी भूषविले होते. ते आदर्श शेतकरी होते.नारायण परब यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, जावई, दोन भाऊ, बहीण, भावजयी, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. माजी सरपंच उमेश परब व विद्यमान सरपंच रणजीत परब यांचे ते वडील होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)