ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
साळेल येथे मसाला युनिटचा शुभारंभ!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

साळेल येथे मसाला युनिटचा शुभारंभ!

प्रकाशन: 31 Mar 2023 09:34 PM
वाचन संख्या 47

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत युनिट

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : साळेल थळकरवाडी येथील श्रीम.पूजा बजरंग गावडे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत स्थापीत केलेल्या श्री समर्थ मसाले या युनिटचा शुभारंभ मालवण तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच श्री.रविंद्र साळकर, कृषि अधिकारी मालवण श्री.दिनेश लंबे माजी प स सदस्य श्री.कमलाकर गावडे, कृषी सहा. श्रीम.मनिषा गिते,श्री.रोशन गावडे, श्री. बजरंग गावडे,श्रीम.साक्षी परब, श्रीम संपदा गावडे, श्रीम. साक्षी गावडे, श्रीम गायत्री गावडे तसेच बचत गट महिला व शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना योजना अंतर्गत माहिती देण्यात आली. तसेच जास्तीत जास्त शेतकरी यांनी लाभ घेण्यासाठी आवाहन केले. यावेळी श्रीम. पूजा गावडे यांनी प्रक्रिया युनिट मुळे स्वतः ला रोजगार मिळाला व वाडीतील/गावातील लोकांना दूरवर जावे लागणार नाही वेळ वाचेल असे मनोगत व्यक्त केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स