बेकायदेशीर दारु वाहतुकीवर बांदा पोलीसांची कारवाई एकूण ६ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
बांदा /राकेश परब: गोवा वरुन मुंबई च्या दिशेने एका कार मधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर बांदा पोलिसांनी कारवाई करत एकूण ६ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रशांत सोमनाथ येरकळ (वय २५, रा. वरवंटी, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार यांनी काल मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की बांदा-वाफोली मार्गावर गणेश मंदिर जवळ रस्त्यावर गोव्यातून लातूर येथे जाणाऱ्या होंडा कंपनीच्या एमएच १४ एफएस ३६६३ ही गाडी तपासणीसाठी थांबवली असता या गाडीत गोवा बनावटीची दारू बिगर परवाना लपवून ठेवलेली आढळली. याप्रकरणी मुद्देमाल जप्त करत मोटार चालकावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ क ६५(अ),६५(इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बांदा पोलीस श्री तेली करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)