ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री देव रामेश्वर मंदिर आचरा येथे उद्या रामजन्म सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री देव रामेश्वर मंदिर आचरा येथे उद्या रामजन्म सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी

प्रकाशन: 29 Mar 2023 09:27 PM
वाचन संख्या 65

चिंदर/विवेक परब: संस्थानी थाटाकरीता प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा रामनवमी उत्सव उद्या ३० मार्च रोजी शाही थाटात साजरा होणार आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवा निमित्त रामेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानचे सर्व मानकरी, देवसेवक, नोकर-चाकर, महालदार, विश्वस्त मंडळ हा उत्सव दिमाखात पार पाडण्यासाठी  प्रयत्नशील राहणार आहेत.या उत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, बेंगलोर येथील श्री रामेश्वर भक्तगण आचरे येथे मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गुढीपाडव्यापासूनच रामेश्वर मंदिरात भक्तांची रिघ लागली होती. गुढीपाडवा ते लळीतापर्यंत अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात रघुपती मुर्तीची पूजा, रोज दुपारी रघुपतीची आरती, सायंकाळी दरबारी प्रख्यात गायकांचा गायनाचा कार्यक्रम व रात्री उशिरा शाही लवाजम्यासह पालखी मिरवणूक सोहळा व कीर्तन होणार आहे.विविध संगीत  कार्यक्रमांची मेजवानी उद्या गुरुवार 30 मार्च रोजी रामनवमी उत्सव होणार असून रामजन्माचे किर्तन श्री. मिलंदबुवा कुळकर्णी करणार असून सायं. ०५:३० वा. गायिका श्रीम. निराली कार्तिक (पुणे) यांचे गायन होणार आहे.शुक्रवार ३१ मार्च रोजी सकाळी १० वा. गायिका श्रीम. निराली कार्तिक (पुणे)यांचे गायन,शनिवार ०१ एप्रिल रोजी रात्री ०९:३० वा. विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ आचरा यांचा कार्यक्रम ‘आचरा आनंदरंग पांडुरंग पांडुरंग ‘ हा कार्यक्रम होणार असून कलाकार दौलत राणे, मंदार सांबारी, उदय पुजारे, विजय कदम यांचा सहभाग असणार आहे.बुधवार ०५ एप्रिल रोजी रात्री ११:०० वा. हनुमान जयंती निमित्त श्री. रामेश्वर प्रॉडक्शन, मुंबई यांचे दोन अंकी नाटक ‘गाव तसो चांगलो’  होणार आहे.गुरुवार ०६ एप्रिल रोजी हनुमान जयंती, पहाटे पालखी नंतर श्री हनुमान जन्माचे किर्तन बुवा श्री. मिलिंद बुवा कुळकर्णी करणार आहेत. या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी कार्यकामांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाचे अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी व सचिव अशोक पाडावे यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स