राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक व सेवानिवृत्त मान्यवरांचा गौरव!
राष्ट्रीय- राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ सिंधुदुर्ग शाखेचे आयोजन
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ सिंधुदुर्ग शाखे मार्फत २०२२/२०२३ च्या राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.रघुनाथ (नंदन) घोगळे व क्रांतिज्योती सावित्री माई फुले राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ.स्नेहलता राणे यांना मान्यवरांच्या शुभहस्ते माध्यमिक शिक्षक पतपेढी ओरोस येथे गौरवण्यात आले.या गौरव सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.शिवराज सावंत,राज्यकार्याध्यक्ष श्री.दशरथ शिंगारे,विभागीय कार्याध्यक्ष श्री.आनंद जाधव,जिल्हाकार्याध्यक्ष श्री.जयदेव सारंग,जिल्हा कोषाध्यक्ष श्री.उदय गोसावी,प्रसिद्धी प्रमुख श्री.शामसुंदर सावंत,प्राध्यापक श्री.जगदिश राणे इत्यादी मान्यवर व राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक बंधु,भगिनीं उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त झालेल्या संघटनेचे सदस्य श्री.राजाराम बिडकर सर व श्री.औदुंबर भागवत सर यांनाही सन्मानीत करण्यात आले. या सन्मान सोहळ्याला उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत जिल्हाध्यक्ष श्री.शिवराज सावंत यांनी केले,प्रास्तविक श्री.दशरथ शिंगारे यांनी केले,आभार श्री.जयदेव सारंग यांनी मानले,कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.शामसुंदर सावंत यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)