ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवणने जपली सामाजिक बांधिलकी!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवणने जपली सामाजिक बांधिलकी!

प्रकाशन: 29 Mar 2023 08:33 PM
वाचन संख्या 47

श्रावण येथील युवतीला वैधकीय उपचारासाठी केली ३५ हजारांची मदत

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील श्रावण गावातील कुमारी सुचिता सदानंद बागवे हिच्या ऑपरेशनसाठी खर्चाची मदत व्हावी यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवणने आपल्या सदस्यांना मदतीसाठी आवाहन केले होते. सुचिता हिच्या आजारपणातील आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास विचारात घेऊन संघटनेतील सदस्यांनी काही प्रमाणात रक्कम आर्थिक मदत म्हणून जमा केली. जमा झालेली सुमारे ३५ हजार रुपये रक्कम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री. सदानंद बागवे यांना सुपुर्द करण्यात आली. यावेळी संघटनेचे सचिव गणेश सुरवसे, जिल्हा सदस्य सुभाष नाटेकर, राजेश भिरवंडेकर, दीपक वेंगुर्लेकर, शिवानंद सोलापुरे, चंद्रकांत माने, नामदेव एकशिंगे, परशुराम गुरव, विद्यालय पाटील, कृष्णा कोकाटे, देवानंद तेली, संदीप नलावडे, संतोष वरक, समीर चव्हाण, श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीकांत मुद्राळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश चव्हाण, शिवराम परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

अखिल संघाचे जिल्हा सदस्य श्री. श्रीकृष्ण बागवे यांनीही आपल्या बागवे समाज सेवा संघ मसुरे देऊळवाडा यांच्यातर्फे रक्कम रुपये दहा हजार एवढी मोलाची मदत मिळवून दिली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवण या संघटनेमार्फत विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. समाजातील गरजू कुटुंबांच्या अडीअडचणीच्या वेळी त्यांच्या समस्या जाणून घेऊन कुटुंबाप्रमाणे सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहण्यारी ही एक संघटना आहे. कोविड 19 च्या काळात सुद्धा संघटनेच्या वतीने अनेक कुटुंबांना वस्तुरूप व आर्थिक मदत करण्यात आली होती.

सुचिता ही आजारपणातून लवकर बरी होवो, व त्यांच्या कुटुंबाच्या मनोकामना पूर्ण होवोत ही सदिच्छा उपस्थित शिक्षकांनी दिली. तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनीही मदत करण्याचे आवाहन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स