ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पाडलोस - भाकरवाडीत रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

पाडलोस - भाकरवाडीत रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

प्रकाशन: 28 Mar 2023 04:04 PM
वाचन संख्या 43

बांदा /राकेश परब : पाडलोस-भाकरवाडी परिसरात रेल्वे ट्रॅकवर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला. संबंधित युवक हा २५ ते ३० वर्ष वयोगटातील असून तो रेल्वेतून खाली कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर युवकाचा घातपात की आत्महत्या याबाबतही साशंकता आहे. अद्यापपर्यंत त्याची ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. बांदा पोलीसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवक हा परप्रांतीय असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्याच्या खिशात मडगाव रेल्वे स्टेशन पर्यंतचे तिकीट सापडले. तसेच एक डायरी आढळून आली. मात्र त्यात पुरावा सदृश्य कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नाही.    

दरम्यान, मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस येताच बांदा पोलिसांनी रविवारी मध्यरात्री घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. त्यासाठी रुग्णवाहिका चालक तथा इन्सुलीचे युवा कार्यकर्ते हेमंत वागळे यांनी पोलिसांना सहकार्य केले. त्यांच्यासह मध्यरात्री १०८ रुग्णवाहिकेच्या डॉ. अनघा बांद्रे, कर्मचारी दादा गवस, पोलीस हेड काँस्टेबल संजय हुंबे यांनी घटनास्थळी भेट दिली.   

  बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन केले. सदर युवकाच्या डोक्याला, छातीला जबर दुखापत झाली असून व्हीसेरा राखून ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स