ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
जेष्ठ दशावतार कलावंत अनंत लब्दे यांचे निधन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जेष्ठ दशावतार कलावंत अनंत लब्दे यांचे निधन

प्रकाशन: 28 Mar 2023 03:53 PM
वाचन संख्या 39

मसुरे ( प्रतिनिधी):  मुणगे कारीवणेवाडी येथील जेष्ठ दशावतार कलावंत,प्रगतशील शेतकरी अनंत सदाशिव लब्दे ( ८९ वर्ष) यांचे वार्धक्याने नालासोपारा- मुंबई येथे निधन झाले.आबा या टोपण नावाने ते ओळखले जात.  ते उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक  उत्तम गावठी वैद्य होते. गावात वैधकीय सुविधा नसताना त्यांचा मोठा आधार होता. आचरा बंदर बोट सेवा चालू असताना होडी व्यवसाय असल्याने अनेक जण  होडीने वाहतुकीसाठी त्यांना संपर्क करायचे. कुटुंबवत्सल व परोपकारी वृत्तीने ते सुपरिचित होते. वाडीतील सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग असायचा. एकत्र कुटुंब पद्धतीचे ते कुटुंब प्रमुख होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, भाऊ, बहीण, जावई, पुतणे, नातवंडे आणि नात जावई असा मोठा परिवार आहे.श्री भगवती एज्युकेशन सोसायटी खजिनदार व रिझर्व्ह बँक सेवानिवृत्त अधिकारी सदाशिव उर्फ़ काका लब्दे यांचे ते काका होत.नालासोपारा स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स