ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हिंदळे येथील दिंडी भजन स्पर्धेत तोरसोळे मंडळ प्रथम !
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हिंदळे येथील दिंडी भजन स्पर्धेत तोरसोळे मंडळ प्रथम !

प्रकाशन: 28 Mar 2023 03:48 PM
वाचन संख्या 30

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ, हिंदळे भंडारवाडा यांच्या वतीने गुढीपाडवा मांडानिमित्त आयोजित दिंडी भजन स्पर्धेत आई भवानी कलादिंडी तोरसोळे मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष परेश खोत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेत द्वितीय क्रमांकविठ्ल रखुमाई भजन दींडी मंडळ आचरा, तृतीय क्रमांक श्रीगणेश दींडी भजन मंडळ, मालवण तरउत्तेजनार्थ क्रमांक श्री गांगोरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोयरे यांनी मिळविला. परीक्षण देवदत्त पुजारे ( मुणगे), तुळशीदास मेस्त्री ( हिंदळे), सदानंद कुंभार (हिंदळे) यांनी केले.प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे १० हजार, सात हजार, तीन हजार तर उतेजनार्थ दोन हजार रुपयांचे पारितोषिक व प्रत्येकी चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. उद्घाटन व बक्षीस वितरणप्रसंगी सरपंच मकरंद शिंदे, अध्यक्ष परेश खोत, देवदत्त पुजारे, प्रशांत खोत, कमलाकर मयेकर, मंगेश मयेकर, विजय शेटये, समीर हळदणकर, मनोज जाधव, बबन शेटये, अनिकेत हिंदळेकर, किरण हळदणकर, योगेश पाटील, दयानंद तेली,मंगेश मयेकर,समील हळदणकर, भाई मांजरेकर, दीप्ती खोत, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स