ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांचा मुणगेत समाजोपयोगी उपक्रम!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांचा मुणगेत समाजोपयोगी उपक्रम!

प्रकाशन: 28 Mar 2023 03:41 PM
वाचन संख्या 39

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :मुणगे गावातील प्रभाग क्रमांक एक मध्ये यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या सौजन्याने तसेच आडबंदरचे सुपुत्र श्री. आनंद मालाडकर यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत सदस्या सौ. रवीना मालाडकर,सौ.अंजली सावंत, माजी उपसरपंच श्री.धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ. सायली बागवे यांच्या प्रयत्नांनी गुढीपाडवा मराठी नूतन वर्षानिमित्त महिला बचत गटाच्या सदस्यांची मार्च,एप्रिल महिन्याची मासिक वर्गणी बचत गटाच्या अध्यक्षा, सचिवांकडे सुपूर्त करण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक एक अंतर्गत आडबंदर, आपई, वाघोळी, कारीवणे वाडी या वाड्यांमध्ये मिठाई वाटत मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सातत्याने आपल्या प्रभागातील लोकांशी जनसंपर्क साधत नवनवीन सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी कायम ठेवल्याने सदस्यांना विभागातील सर्व स्तरावर लोकांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे अशी माहिती आनंद मालाडकर यांनी यावेळी दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स