ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
लेप्टंन विनायक देसाई यांचा डेगवे आंबेखणवाडीच्या ग्रामस्थातर्फे सत्कार संपन्न..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

लेप्टंन विनायक देसाई यांचा डेगवे आंबेखणवाडीच्या ग्रामस्थातर्फे सत्कार संपन्न..!

प्रकाशन: 28 Mar 2023 03:15 PM
वाचन संख्या 45

बांदा/ राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावचे सुपुत्र श्री विनायक चंद्रकांत देसाई हे भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून कार्यरत असताना सैनिक दलाच्या लेप्टंन पदाची विभागीय परिक्षा देत होते.त्यात ते उत्तीर्ण झाले असून “लेप्टंनपदी” त्यांची नुकतीच हैद्राबाद येथे नियुक्ती झाली आहे.त्यामुळे ते सदर ठिकाणी हजर होण्यापूर्वी आपल्या स्वग्रामी आले होते.त्याचे औचित्य साधून डेगवे -आंबेखणवाडीच्या ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार नुकताच “श्री ब्राह्मणीतीर्थ क्षेत्र”आंबेखणवाडी येथे रात्री आयोजित केला होता.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेगवे माजी सरपंच श्री मंगलदास देसाई हे होते.

यावेळी श्री ब्राह्मणी स्थळाचा पुजारी श्री वामन देसाई यांनी विधीवत पुजा करून देवतांना गाव गाराणे घातले.प्रास्ताविक भाषणात माजी सरपंच श्री मंगलदास देसाई यांनी डेगवे गांव हा सैनिक सेवेत असणाऱ्या पैकी एक आहे.या गावातील अनेक सुपुत्राने पोलीस व सैनिक पेशा पत्करुन देशसेवा केली आहे.याचा आमच्या डेगवे ग्रामस्थांना सार्थ अभिमान वाटतो आहे.श्री विनायक देसाई यांच्या सारखी जिद्द व चिकाटी पाहून आमचे इतर बांधव त्यांची प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रात काम करतील असा आम्हाला दृढ विश्वास वाटतो.आजच्या युवाशक्तीला त्यांनी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

विनय देसाई याचा सत्कार जेष्ठ ग्रामस्थ श्री. मनोहर देसाई यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन केला.या वेळी त्याची आई व कुटुंबातील सर्व लोक व ग्रामस्थ आर्वजून उपस्थित होते.

सदर सत्काराला उत्तर देताना श्री.विनायक देसाई म्हणाले माझे अनेक सत्कार झाले परंतु आज माझा सत्कार घरातील लोकांनी केला आहे तो माझ्या साठी अविस्मरणीय क्षण आहे.तो मी कदापीही विसरू शकत नाही.माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली ती मला माझ्या आयुष्यात उर्जा देणारी आहे.मी ज्या भुमीत जन्माला आलो ज्या मातीत वाढलो.त्या मातीतील लोकांनी केलेले कौतुक निश्चितच मला प्रेरणादायी आहेत.त्याबध्दल मी सर्वांचा आभारी आहे.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शामसुंदर देसाई,गोपाळ देसाई, सदानंद देसाई, वामन देसाई, विष्णू देसाई,तुकाराम देसाई,अत्माराम देसाई, विजय देसाई, योगेश मांजरेकर इत्यादी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स