आंबोली ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
बांदा /राकेश परब : कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली गावातील दिव्यांग बांधवांसाठी कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी आंबोली गावातील दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत आंबोलीच्या सरपंच मा.सौ. सावित्री पालेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.सारिका संदीप गावडे, प्रशिक्षक प्रा.विनायक ठाकूर, कोकण कला व शिक्षण विकास संस्थचे प्रकल्प व्यवस्थापक श्री.प्रथमेश सावंत, संस्थेचे प्रशिक्षण समन्वयक श्री समिर शिर्के व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच यांनी दिव्यांग बांधवांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यात आंबोली ग्रामपंचायत च्या वतीने दिव्यांगांसाठी व्यवसायासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)