ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वराड येथे ३० मार्च पासून राणे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

वराड येथे ३० मार्च पासून राणे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

प्रकाशन: 25 Mar 2023 07:57 PM
वाचन संख्या 51

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : प. पू. राणे महाराज सेवा ट्रस्टतर्फे रामनवमी आणि राणे महाराजांच्या आठव्या पुण्यतिथी. उत्सवानिमित ३० व ३१ मार्च रोजी वराड कुसरवेवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ३० रोजी सकाळी १० वा. रामजन्माचे कीर्तन, दुपारी १२ वा. रामजन्म, १ वा: महाआरती, ३.३० वा. सुनील पालव यांचे प्रवचन, ४ वा. नामदेव महाराज भक्त मंडळी, सिंधुदुर्ग यांचे भजन, ६ वा. गीत हनुमंत – माजगाव संगीत मित्रमंडळ, सावंतवाडी यांचा गायन कार्यक्रम, रात्री ८ वा. संजय दळवी, तळगाव यांचे भजन. ३१ रोजी राणे महाराजांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ९ वा. लघुरुद्र, १० वा. हरिपाठ, ११ वा. संदेश सामंत झाराप यांचा गायन कार्यक्रम, दुपारी १२ वा. महाआरती, १.३० वा. महाप्रसाद, ४ वा. पालखी मिरवणूक (कै. गुरुनाथ म्हाडगुत कट्टा यांचे घर ते राणे महाराज मठ), रात्री ८ मा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ‘रेणुका ‘वध’ नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स