ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
'करे योग ..रहे निरोग' चा नारा देत बांद्यात पतंजली योगची प्रभात फेरी उत्साहाने संपन्न.

'करे योग ..रहे निरोग' चा नारा देत बांद्यात पतंजली योगची प्रभात फेरी उत्साहाने संपन्न.

प्रकाशन: 24 Mar 2023 08:57 PM
वाचन संख्या 221

गुढीपाडवा तथा नववर्षाच्या आरंभाचे होते औचित्य.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे गुढीपाडवा तथा हिंदू नववर्ष आरंभ दिवसाचे औचित्य साधून बांदा पतंजली योग समिती तर्फे बांदा शहरात योग प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते .

सर्वसामान्य लोकांपर्यंत योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार याबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने या योग प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले .
सदर प्रभात फेरी मध्ये पतंजली योग समिती बांदाचे सर्व योग साधक आणि बांदा शहरातील इतर सर्व नागरिक यांनी सहभाग घेतला. ही प्रभात फेरी श्री देव बांदेश्वर मंदिर बांदा येथून सकाळी सात वाजता निघाली. नंतर छत्रपती संभाजी महाराज चौक, गवळी तिठा, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी ग्रामपंचायत इमारत च्या मार्गे पुन्हा श्री बांदेश्वर मंदिर येथे येऊन या योग प्रभात फेरी ची सांगता झाली.

या योग प्रभात फेरी मध्ये ‘करे योग…. रहे निरोग’,भारत माता की ,वंदे मातरम, श्रीराम आदी घोषणा देत सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. योग ही आपली संस्कृती आहे आणि योगाभ्यास करणे व इतरांना करावयास लावणे हे कार्य पतंजली योग समिती बांदा ने हाती घेतले आहे व या कार्याला सर्वच स्तरावर प्रतिसाद वाढत आहे असे योग समितीतर्फे सांगण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स