ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणात मत्स्य जयंती भव्य स्वरुपात झाली साजरी ; गाबित समाज व धुरीवाड्यातील श्रीकृष्ण मंदिराचे आयोजन.

मालवणात मत्स्य जयंती भव्य स्वरुपात झाली साजरी ; गाबित समाज व धुरीवाड्यातील श्रीकृष्ण मंदिराचे आयोजन.

प्रकाशन: 24 Mar 2023 06:10 PM
वाचन संख्या 627

मालवण | सुयोग पंडित (मुख्य संपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या धुरीवाडा येथे आज मत्स्य जयंती भव्य स्वरुपात झाली साजरी झाली.

हिंदू पौराणिक कथांनुसार मत्स्य अवतार हा हरी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे. चैत्र शुक्ल तृतीया या तिथीला ही मत्स्य जयंती साजरी केली जाते. मत्स्य जयंतीच्या दिवशी हिंदू भाविक आणि खासकरुन मच्छिमार बांधव भगवान विष्णूंच्या या मत्स्य स्वरुपाची भक्ती समर्पणाने करतात. देशभरातील भगवान विष्णू मंदिरात हा सण विविध पद्धतीने साजरा करतात.

आज कृष्ण मंदिर, धुरीवाडा येथे मत्स्य रुपी विष्णू देवाच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून मत्स्य जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पारंपरिक मच्छीमार व कृष्ण मंदिर अध्यक्ष दत्ता केळुसकर यांनी मत्स्य रुपी विष्णू प्रतिमेचे पूजन केले. मत्स्य व्यवसाय समोर असलेली आव्हाने व विघ्ने दूर करून सागर साधन संपत्ती चा शाश्वत वापर करण्याची सन्मती माणसाला द्यावी असे साकडे मत्स्यरूपी विष्णू देवाला घालण्यात आले.

गाबित समाज,कृष्ण मंदिर धुरीवाडा -मालवण व सागरी सुरक्षा मंच च्या वतीने आयोजित केलेल्या मत्स्य जयंती कार्यक्रमास गावित समाज सिंधुदुर्ग च्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवला व मत्स्य जयंती साजरी केली .यावेळी अखिल भारतीय गाबित समाज संघाचे अध्यक्ष परशुराम ऊर्फ जी.जी. उपरकर , सिंधुदुर्ग गाबित जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर .हरी खोबरेकर , . पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी , सन्मेश परब, दिलीप घारे,सौ. सेजल परब ,सौ.मेघा गांवकर, सौ.चारू आचरेकर .किरण कुबल,.संजय बांदकर, डॉक्टर प्रमोद कोळंबकर ,सौ.स्वाती कुबल ,.आंड जामसंडेकर , दीपक तारी, ॲड. संदीप चांदेकर उपस्थित होते.

मत्स्य जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत गांवकर पणशीकर , भाऊ सामंत, विलास हडकर व धुरीवाडा ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. गाबित समाज संघटक .रविकिरण तोरसकर यांनी याविषयी माध्यमांना विस्तृतपणे विवेचन संदेश प्रसारीत केला.
भविष्यात सिंधुदुर्गातील प्रत्येक मच्छिमार गावांमध्ये मत्स्य जयंती साजरी करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 322

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स