ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्रा. रमाकांत सीताराम गावडे यांना राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्रा. रमाकांत सीताराम गावडे यांना राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

प्रकाशन: 24 Mar 2023 02:40 PM
वाचन संख्या 450

बांदा : राकेश परब गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्रा. रमाकांत सीताराम गावडे यांना राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून रविवार दिनांक २६ रोजी हरमल-गोवा येथे केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोईली यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रा. गावडे हे गेली २७ वर्षे महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सावंतवाडी तालुक्यात अनेक समजपयोगी उपक्रम राबविले आहेत. ग्रामीण भागातील मुलींना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी प्राथमिक शाळेतील तब्बल १०० विद्यार्थिनी त्यांनी दत्तक घेत त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना देखील त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबाबत इंटींग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन बेळगाव या संस्थेने त्यांची पुरस्कारसाठी निवड केली आहे. या सोहळ्यात दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील निवडक पुरस्कारप्राप्त व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, कोल्हापूरचे महापौर राजू शिंगाडे, बेळगावचे खासदार अमरसिंग पाटील, अरविंद घट्टी, गुजरातच्या कोमल शर्मा, दिल्लीचे विशेष अभियंता जयराज लोंढे, बिदरचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश मेघन्नावर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रा. गावडे यांचे अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स