ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोळवण येथे शासकीय योजनेतून गोठा बांधणे कामाचा शुभारंभ!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोळवण येथे शासकीय योजनेतून गोठा बांधणे कामाचा शुभारंभ!

प्रकाशन: 21 Mar 2023 05:54 PM
वाचन संख्या 43

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोळवण येथील प्रगतशील शेतकरी श्री. बाबू (बबन)विठू वरक यांच्या शेतात गोठा बांधणे कामाचा भूमिपूजन कार्यक्रम श्री. बाबू वरक व सौ. सुनंदा वरक यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमास ग्रा. पं. सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर, सौ. प्राजक्ता चिरमुले, तसेच ग्रामस्थ श्री. जानू वरक, श्री. पांडू वरक, सौ. स्नेहा वरक, सौ. लक्ष्मी वरक, श्रीम. जनाबाई वरक, श्री. भाई चिरमुले, श्री. सुहास घाडी, श्री. संदेश पवार, तसेच ग्रामरोजगारसेवक श्री. रामकृष्ण नाईक, ग्रा.पं.कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्रीम. करुणा राणे उपस्थित होते. गावातील बाळकृष्ण निळकंठ जाधव-कुमामे, मनोज मारुती चव्हाण-कुमामे, प्रभानंद रघुनाथ पवार-गोळवण, संभाजी गुणाजी गावडे-गोळवणयांचे देखील गोठा बांधणे कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.सदर लाभार्थ्यांना गोठा बांधणे साठी ७७ हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स